Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Pt. IV-A Ext. 100 (11-4-2019).pmd, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र राज्यातील भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनाच्या नियंत्रणाखालील राजपत्रित अधिकाऱ्यांकरिता विभागीय परिक्षेचे विनियमन संबधी अधिसूचना

Published 11 April 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-04-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१ १

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ५, अंक ४३] गुरुवार, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१ [पृष्ठे १६, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक १००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ११ एप्रिल २०१९ अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक एमएनए. ०२१६/सी. आर. १५/उद्योग-९.---- भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद-९ च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करताना आणि राज्यात किंवा त्याच्या कोणत्याही भागात लागू असलेले व याबाबतीत निर्गमित केलेले सर्व अस्तित्वात असलेले नियम व आदेशांचे अधिक्रमण करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल याद्वारे महाराष्ट्र राज्यातील भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाच्या नियंत्रणाखालील राजपत्रित अधिकायांंकरिता विभागीय परीक्षेचे विनियमन करून पुढीलप्रमाणे नियम करीत आहेत :----

१. संक्षिप्त नाव.---- या नियमांना महाराष्ट्र भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय राजपत्रित अधिकारी विभागीय परीक्षा नियम, २०१८ असे म्हणावे. २. व्याख्या.----या नियमात, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर----

(क) " शासन " म्हणजे महाराष्ट्र शासन. (ख) " आयोग " म्हणजे महाराष्ट्र लोक सेवा आयोग. (ग) " संचालनालय " म्हणजे भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, महाराष्ट्र शासन. (घ) " परिशिष्ट " म्हणजे या नियमांचे परिशिष्ट. (च) " विद्यमान नियम " म्हणजे असे आदेश व नियम जे भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयात काम करणाया राजपत्रित अधिकायांकरिता होणाया विभागीय परीक्षांसाठी अंमलात आहेत व ते सदरचे राजपत्रात प्रकाशन होणाया तारखपूर्वी लागू आहेत.

(छ) " राजपत्रित अधिकारी " म्हणजे भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, नागपूर मध्ये खालील पदावर नियुक्त केलेल्या व्यक्ती----

(१) संचालक, (२) सहसंचालक, (३) वरिष्ठ उप संचालक,

भाग चार-अ----१००-१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१ (४) उप संचालक,

(५) वरिष्ठ भूवैज्ञानिक,

(६) भूवैज्ञानिक,

(७) मुख्य आवेधन अभियंता,

(८) आवेधन अभियंता,

(९) प्रशासन अधिकारी,

(१०) सहायक प्रशासन अधिकारी,

(११) कनिष्ठ भूवैज्ञानिक,

(१२) सहायक आवेधन अभियंता.

(ज) " तांत्रिक पदे " म्हणजे भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, नागपूर मध्ये खालील पदावर नियुक्त केलेल्या व्यक्ती,-----

(१) संचालक,

(२) सहसंचालक,

(३) वरिष्ठ उप संचालक,

(४) उप संचालक,

(५) वरिष्ठ भूवैज्ञानिक,

(६) भूवैज्ञानिक,

(७) मुख्य आवेधन अभियंता,

(८) आवेधन अभियंता,

(९) कनिष्ठ भूवैज्ञानिक,

(१०) सहायक आवेधन अभियंता.

(झ) " प्रशासकीय पदे " म्हणजे भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, नागपूर मध्ये खालील पदावर नियुुक्त केलेल्या व्यक्ती ---

(१) प्रशासन अधिकारी,

(२) सहायक प्रशासन अधिकारी.

(त) " परीक्षा " म्हणजे या नियमांतर्गत विहित करून नियम ९ अंतर्गत विहित केलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे घेण्यात आलेली विभागीय परीक्षा.

३. परीक्षा उत्तीर्ण करण्याची आवश्यकता .--- जी व्यक्ती नामनिर्देशनाने किंवा पदोन्नतीने राजपत्रित पदावर नियुक्त झाली आहे अशा व्यक्तीला सेवेत अखंड राहण्याकरिता किंवा कायम होण्याकरिता, जर त्यांना नियम ८ अंतर्गत सूट दिली नसेल तर सदर विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

४. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कालावधी आणि संधी.----

(१) या नियमांतील तरतुदींच्या अधीन राहून ज्या व्यक्तीची संबंंधित राजपत्रित पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती झालेली असेल त्यांना संबंधित सेवा प्रवेश नियमांतर्गत विहित केलेल्या परिवीक्षा कालावधीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

(२) या नियमांतील तरतुदींच्या अधीन राहून ज्या व्यक्तीची संबंंधित राजपत्रित पदावर पदोन्नतीने नियुक्ती झालेली असेल त्यांना तीन वर्षात दोन संधीमध्ये विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

तथापि, या नियमांमध्ये विहित केलेल्या कालावधीमध्ये जर कोणत्याही कारणाने विभागीय परीक्षा घेण्यात आली नसेल तर तो कालावधी परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता गणन्यात आलेल्या पूर्ण कालावधीमधून वगळण्यात येईल.

(३) आणखी असेही नमूद करण्यात येते की, जर पात्र उमेदवाराने विशिष्ट वर्षात परीक्षेकरिता आवेदन पत्र भरून दिलेले नसेल किंवा आवेदन पत्र भरुन दिल्यानंतर परीक्षेस उपस्थित झाले नसतील तरीही सदरील परीक्षेकरिता त्या उमेदवाराची एक संधी परिगणीत करण्यात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१ ३

५. परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास अपयशाचे परिणाम -----

(१) जर एखादी व्यक्ती नामनिर्देशनाने राजपत्रित पदावर नियुक्त झाली असेल आणि नियम ४ मधील उप नियम (१) नुसार दिलेल्या कालावधीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यास अपयशी ठरली असेल तर त्यास सेवामुक्त किंवा बडतर्फ करण्यात येईल.

(२) जर एखादी व्यक्ती पदोन्नतीने राजपत्रित पदावर नियुक्त झाली असेल आणि नियम ४ मधील उप नियम (२) नुसार विर्िनदिष्ट केलेल्या कालावधीत व संधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण होण्यास अपयशी ठरली असेल तर त्याला ---

(क) त्यांच्या आधी परीक्षा उत्तीर्ण होणाया सर्व अधिकायांशी, उच्च पदावर पदोन्नतीच्या कारणासाठी, सेवाज्येष्ठता गमवावी लागेल. या प्रकरणात अशा अधिकायांची सेवाज्येष्ठता परीक्षा उत्तीर्ण केलेल्या तारखेला निश्चित केल्या जाईल किंवा नियम ८ च्या अंतर्गत त्याला परीक्षा देण्यापासून वगळले जाईल ; आणि

(ख) अशा अधिकायाला जोपयर्ंत तो परीक्षा उत्तीर्ण होत नाही तोपयर्ंत त्याच्या पदावर कायम करण्यात येणार नाही आणि ज्या पदावर तो आहे त्या पदाच्या वेतन श्रेणीमध्ये त्याला लगत नंतरची वर्ाषिक वेतनवाढ मिळणार नाही. अशी रोखून धरलेली वेतन- वाढ त्या तारखेपासून जेव्हा तो परीक्षा उत्तीर्ण होईल किंवा त्याला परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून नियम ८ च्या अंतर्गत सूट दिली असेल, त्याला देय राहील. पुढच्या सर्व वेतनवाढी कोणतीही वेतनवाढ रोखून धरली नाही असे मानून, उपर्ाजित होतील. मागील कालावधीतील थकबाकी अनुज्ञेय राहणार नाहीत.

६. नमूद केलेल्या भाषांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेतली जाईल ----

(१) परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्षातून एकदा प्राधान्याने माहे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये घेण्यात येईल.

(२) प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी भाषेतून राहतील.

७. अतिरिक्त संधी देणे.---- शासनास अपवादात्मक परिस्थितीमध्ये, विवेकाधिकाराने अशा उमेदवाराला, जो नियम ४ मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण होण्यास अयशस्वी ठरला, एक पेक्षा अधिक नसलेली एक अतिरिक्त संधी, जर त्याने असा अर्ज केला असेल तर, परीक्षेत बसण्यासाठी देऊ शकते आणि त्याचा परिविक्षा कालावधी कमाल एक वर्षाने, नियम ४ मध्ये दिलेल्या २ वषार्ंच्या कालावधीच्या पुढे, तद्नुसार वाढवू शकते.

जर अधिकायाने परीक्षेत बसण्यासाठी मिळालेल्या संधीचा उपयोग आयोगाने घेतलेल्या लगतच्या सलग परीक्षेत केला असेल.

८. सूट.---- हे नियम त्या अधिकायाला लागू होतात ज्याला परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळेल जर ----

(क) तो हे नियम प्रारंभ होण्यापूर्वी वर्तमान विभागीय परीक्षा नियमांप्रमाणे आधिच परीक्षा उत्तीर्ण झाला असेल ;

(ख) जर त्याला वर्तमान नियमांतर्गत अशी परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट असेल ;

(ग) जर एखाद्या अधिकायाने नियम २ च्या उप नियम (छ) अंतर्गत नमूद केलेल्या एखाद्या पदावर असतांना परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर त्याला उच्च पदावर झालेल्या पदोन्नती नंतर ही परीक्षा उत्तीर्ण करण्याची गरज नाही.

(घ) त्याने हे नियम निर्गमित होण्याच्या दिनांकास आणि त्यानंतर, कोणत्याही दिवशी वयाची पन्नास वर्षे पूर्ण केली असतील.

परंतु, या नियमातील नियम ४ च्या उप नियम (१) मध्ये नमूद केलेल्या अधिकायांंना या कारणाअंतर्गत सूट मिळणार नाही.

९. अभ्यासक्रम :-----

(१) परीक्षेसाठी अभ्यासक्रम परिशिष्ट " अ " मध्ये नमूद केलेल्याप्रमाणे राहील ;

(२) सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येकी १०० गुणांची व तीन तासांच्या कालावधीची राहील. पहिल्या तीन प्रश्नपत्रिका, या नियमातील नियम २ च्या उप नियम (छ) मध्ये नमूद केलेल्या सर्व अधिकायांना सामाईक राहतील ;

(३) चौथ्या प्रश्नपत्रिकेत ३ भाग राहतील ; भाग क्र. १, भाग क्र. २ आणि भाग क्र. ३ ;

(क) भाग क्र. १ मध्ये सामान्य प्रशासन (प्रवर्तन व व्यवस्थापन) आणि संचालनालयाचे सर्वसाधारण उपक्रम यांचा अंतर्भाव राहील आणि हे सर्व अधिकायांसाठी ज्यांचा उल्लेख नियम (२) च्या अंतर्गत उप नियम (छ) मध्ये केला आहे, अनिवार्य राहील.

(ख) भाग क्र. २ मध्ये खनिज समन्वेषणाचा अंतर्भाव राहील आणि हे सर्व अधिकायांसाठी ज्यांचा उल्लेख नियम (२) च्या अंतर्गत उप नियम (ज) मध्ये केला आहे, अनिवार्य राहील.

(ग) भाग क्र. (३) मध्ये कार्यालय प्रशासनाचा अंतर्भाव राहील आणि हे सर्व अधिकायांसाठी ज्यांचा उल्लेख नियम (२) च्या अंतर्गत उप नियम (झ) मध्ये केला आहे, अनिवार्य राहील.

भाग चार-अ----१००-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१ (४) प्रश्नपत्रिका क्र 1, 2 व 3 या पुस्तकांच्या मदतीने सोडविता येतील. (पुस्तंकासह) (भारत सरकारने व महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेली पुस्तके, शासकीय अधिसूचना व शासन निर्णय)

प्रश्नपत्रिका क्र. 4 पुस्तकांच्या मदतीशिवाय सोडवावी लागेल. (पुस्तकांशिवाय)

(५) सर्व प्रश्नपत्रिका मराठी किंवा इंग्रजी मध्ये सोडविता येतील .

(६) गरजेनूसार व तांत्रिक विषय अद्यावत करणे आवश्यक असल्यास शासन या अभ्यासक्रमात वेळोवेळी शासन निर्णयान्वये बदल करू शकते. १०. परीक्षा उत्तीर्ण होण्याचे मानक.---- परीक्षेत उत्तीर्ण होण्याकरिता प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील एकूण गुणांच्या ५० टक्क्यांचे मानक राहील.

उमेदवाराला परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कोणत्याही एका पेपरसाठी ५ टक्क्यांपयर्ंत सूट मिळू शकेल, जर उमेदवार एकाच वेळी सर्व पेपर्ससाठी बसला असेल व परीक्षा उत्तीर्ण होण्यास पात्र ठरत असेल.

११. श्रेय.---- जर एखादा अधिकारी पहिल्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण झाला असेल आणि त्याला एखाद्या पेपरमध्ये ७५ टक्के किंवा जास्त गुण प्राप्त झाले असतील तर त्या अधिकायाने परीक्षा गुणवत्ता श्रेणीने उत्तीर्ण केल्याचे समजले जाईल आणि त्याच्या या कामगिरीची नोंद त्याच्या गोपनिय अहवालामध्ये केली जाईल.

१२. विषयांमध्ये सूट.---- एखादा अधिकारी जो परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाला असेल परंतु कोणत्याही प्रश्नपत्रिकेत ५५ टक्के किंवा जास्त गुण प्राप्त केलेले असतील, तर त्याला त्याच्या पुढील संधी मध्ये त्या प्रश्नपत्रिकेत पुन्हा उपस्थित राहण्याची व उत्तीर्ण होण्यापासून सूट राहील.

जर अधिकायाने अशी सूट मिळण्यासाठी, जेव्हा त्याला पुढच्या प्रयत्नात परीक्षेला बसावयाचे आहे, तेव्हा लिखित स्वरूपात विशेषत्वाने मागणी केली असेल तर. जर अशी लिखित स्वरूपात सूट मिळण्यासाठी मागणी केली नसल्यास, गृहीत धरले जाईल की उमेदवाराला अशी सूट मिळविण्यात स्वारस्य नाही.

१३. परीक्षेला उपस्थित राहण्याकरिता अर्ज.---- ज्या अधिकायाची परीक्षेला बसण्याची इच्छा आहे तो/ती परिशिष्ट " ब " मध्ये विहित केलेल्या नमुन्यात संचालक, भूविज्ञान आणि खनिकर्म, नागपूर यांना अर्ज करेल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

सतिश गवई,

शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१ ५

परिशिष्ट " अ "

(नियम ०९ पहा)

सेवा नियम आणि वित्तीय नियम

(सर्व पदांसाठी अनिवार्य)

प्रश्नपत्रिका विषय प्रश्नपत्रिकेचा एकूण क्रमांक-१ कालावधी- गुण १०० ३ तास (१) (२) (३) (४)
१. (क) महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ प्रकरण एक, दोन, तीन व पाच आणि या प्रकरणांशी संबंधित परिशिष्टे. (ख) महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ प्रकरण एक, दोन, तीन व पाच आणि या प्रकरणांशी संबंधित परिशिष्टे. (ग) महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा, निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे या काळातील प्रदाने) नियम, १९८१ प्रकरण एक, दोन, तीन व पाच आणि या प्रकरणाशी संबंधित परिशिष्टे. (घ) महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ प्रकरण एक, दोन, तीन, चार, पाच व सहा आणि या प्रकरणांशी संबंधित परिशिष्टे. (च) महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम, १९८२ प्रकरण एक, दोन व तीन आणि या प्रकरणांशी संबंधित परिशिष्टे. (छ) (डीसीपीएस) परिभाषित योगदान निवृत्तीवेतन योजना (ज) सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी, नियम, १९९८. (झ) शासकीय विभागांकडून भांडार खरेदीकरिता कार्यालयीन कार्यपद्धती (ई-लिलाव व ई-टेंडरींग ची कार्यपद्धती) २. मुंबई वित्तीय नियम, १९५९ (आवृत्ती १९७२ प्रकरण १,२,३,४,५,६, १०, ११ व १२. ३. महाराष्ट्र आकस्मिक खर्चाचे नियम, १९६५, (वित्तीय प्रकाशन क्र. ५) संपूर्ण पुस्तक, उप विभाग क्ष्क्ष् (१२) वगळून ज्क्ष्, ज्क्ष्क्ष्क्ष्, क्ष्ज्, , क्ष्, क्ष्क्ष् भाग दोनचे उप विभाग व क्ष्क्ष्क्ष् ची बाब (दोन) व (तीन). ४. महाराष्ट्र बजेट मॅन्युअल (वित्तीय प्रकाशन क्र. ज्क्ष्), क्ष्, ज्क्ष्क्ष्क्ष्, , क्ष्ज् प्रकरण क्ष्क्ष्क्ष्, क्ष्क्ष्, क्ष्क्ष्क्ष्, ज् व ज्क्ष् आणि या प्रकरणाशी संबंधित परिशिष्टे. ५. महाराष्ट्र शासकीय कर्मचायांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम, २००५ (पुस्तकांसह) (वरील सर्व नियम सुधारित, अद्यावत व शासनाने वेळोवेळी त्याअंतर्गत निर्गमित केलेल्या अधिसूचनांप्रमाणे)
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१

खाण व खनिजे (नियम व विकसन) अधिनियम आणि इतर नियम इत्यादी

(सर्व पदांसाठी अनिवार्य)

प्रश्नपत्रिका विषय प्रश्नपत्रिकेचा एकूण क्रमांक-१ कालावधी- गुण १०० ३ तास (१) (२) (३) (४)
१. खाणी व खनिजे (नियम व विकसन सुधारित) अधिनियम, २०१५ २. मिनरल (एव्हीडन्स ऑफ मिनरल कंटेंट) रुल्स, २०१५ ३. मिनरल (ऑक्षन) रुल्स, २०१५ ४. मिनरल (नॉन एक्स्लुझीव्ह रिकॉनायसंन्य परमिटस् ) रुल्स, २०१५ ५. मिनरल (अदर दॅन अॅटोमीक अॅण्ड हायड्रोकार्बन एनर्जी मिनरल) कन्सेशन रुल्स्, २०१६. ६. प्रधानमंत्री खनिज कल्याण क्षेत्र योजना (पीएमकेकेकेवाय) ७. खनिज संवर्धन व विकास नियम, १९८८ ८. राष्ट्रीय खनिज समन्वेषण न्यास नियम, २०१५ ९. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम (विकसन व नियमन) नियम, २०१३ १०. महाराष्ट्र खनिज (अवैध उत्खनन, वाहतूक व साठवणूक प्रतिबंध) नियम, २००१ ११. वन संवर्धन अधिनियम, १९८० (१९८८ मधील सुधारणेसह) १२. पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ १३. जिल्हा खनिज फाउन्डेशन नियम, २०१६ (पुस्तकांसह) (वरील सर्व अधिनियम, नियम केंद्र सरकारने व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी त्याअंतर्गत निर्गमित केलेल्या सुधारित व अद्यावत अधिसूचना व आदेशांसह)

उद्योग आणि इतर खनिज व खाण संबंधित अधिनियम व नियमन

(सर्व पदांसाठी अनिवार्य)

प्रश्नपत्रिका विषय प्रश्नपत्रिकेचा एकूण क्रमांक-३ कालावधी- गुण १०० ३ तास (१) (२) (३) (४)
१. औद्योगिक धोरण निर्णय, दिनांक ३० एप्रिल १९५६ २ उद्योग (विकास व नियमन) अधिनियम, १९५७ व त्याअंतर्गत नियम ३. कोल माइन्स (स्पेशल प्रोव्हीजन) अॅक्ट, २०१५ ४. परमाणू ऊर्जा सुधारित अधिनियम, २०१५ ५. कोळसा खाणी (संवर्धन व विकास) अधिनियम, १९७४ ६. खनिज तेल व नैर्सगिक वायू नियम, २००८ ७. खाण अधिनियम, १९५२ व खाण (सुधारणा) अधिनियम, १९६९ ८. इ डियन मेटैलीफेरस माइन्स नियमन, २०१२ ं (पुस्तकांसह) (वरील सर्व अधिनियम, नियम केंद्र सरकारने व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी त्याअंतर्गत निर्गमित केलेल्या सुधारित व अद्यावत अधिसूचना व आदेशांसह)
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१ ७

प्रसिद्धी इत्यादी.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१

परिशिष्ट " ब "

(नियम -- १३ पहा)

भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे नागपूर यांचे आस्थापनेवरील

अधिकायांच्या विभागीय परिक्षेसाठी आवेदन पत्र.

वर्ष ------------------

भाग-अ

१. अर्जदाराचे नाव :-- २. पदाचे नाव :-- ३. कार्यालयाचे नाव :-- ४. सेवेत नियुक्तीचा दिनांक :-- ५. अर्जदाराला नियम-१२ अंतर्त प्रश्नपत्रिकेत सूट मिळाली आहे काय ? V É ® ú = k É ® ú " होय " असेल तर खालील माहिती द्यावी ---

(क) परिक्षेला उपस्थित झाल्याचे वर्षे :-- (ख) उपस्थिती क्रमांक (रोल नं) :-- (ग) सुट प्राप्त प्रश्नपत्रिका :-- (घ) प्रत्येक प्रश्नपत्रिकेत प्राप्त गुणांची टक्केवारी :--

तारीख : अर्जदाराची स्वाक्षरी

भाग-ब अर्जदाराने सादर केलेली माहिती तपासण्यात आली व ती बरोबर असल्याची आढळली.

तारीख :

कार्यालयाचा शिक्का

प्रशाकीय अधिकारी, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१ ९

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 11th April 2019

NOTIFICATION

CONSTITUTION OF INDIA.

No. MNA. 0216/C.R.15/Ind 9.— In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of the Constitution of India and in supersession of all existing rules issued in this behalf and in force in the State or any part thereof, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules regulating the Departmental Examination for the posts of Gazetted Officers under the control of the Directorate of Geology and Mining under the Government of Maharashtra namely :—

1. Short title.—These rules may be called the Maharashtra Directorate of Geology and Mining Gazetted Officers departmental examination Rules, 2018.

2. Definition.—In these rules, unless the context otherwise requires :—

(a) " Government" means the Government of Maharashtra ;

(b) "Commission" means the Maharashtra Public Service Commission ;

(c) "Directorate" means The Directorate of Geology and Mining Government of Maharashtra ;

(d) " Appendix " means the Appendix to these rules ;

(e) " Existing rules " means the rules and orders in force for the Departmental Examination for Gazetted Officers in the Directorate of Geology and Mining immediately in force before the date of publication of these rules in the Gazette.

(f) " Gazetted Officers " means the person appointed in the Directorate of Geology and Mining, Nagpur to any of the following posts namely :—

(1) Director

(2) Joint Director

(3) Sr. Deputy Director

(4) Deputy Director

(5) Senior Geologist

(6) Geologist

(7) Chief Drilling Engineer

(8) Drilling Engineer

(9) Administrative Officer

(10) Assistant Administrative Officer

(11) Junior Geologist

(12) Assistant Drilling Engineer

(g) " Technical Posts " means the person appointed in the Directorate of Geology and Mining, Nagpur to any of the following posts namely :—

(1) Director

(2) Joint Director

भाग चार-अ----१००-२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१ (3) Sr. Deputy Director

(4) Deputy Director

(5) Senior Geologist

(6) Geologist

(7) Chief Drilling Engineer

(8) Drilling Engineer

(9) Junior Geologist

(10) Assistant Drilling Engineer

(h) " Administrative posts " means the person appointed in the Directorate of Geology and Mining, Nagpur to any of the following posts namely :—

(1) Administrative Officer

(2) Assistant Administrative Officer

(i) " Examination" means the Departmental Examination prescribed under these rules held according to the syllabus prescribed under rule 9.

3. Necessity of passing the examination.—The person who has appointed by nomination or by promotion to the post of Gazetted Officer shall be required to pass the examination in accordance with these rules for continuation in the service and confirmation on the post unless exempted under rule 8.

4. Period and Chances for Passing the Examination :—

(1) The person who has appointed by nomination shall be required to pass the Examination within the period of probation as provided under the respective recruitment rules for the respective post of Gazetted Officers.

(2) The person who has appointed by promotion shall be required to pass the Examination within three years in two chances from the date of his appointment :

Provided that, if for any reason, the examination is not held in any particular year, that year shall be excluded in computing the total period of years mentioned in this rule. (3) It is also stated that, if an eligible candidate dose not submit an application for an exam conducted in particular year or even after the submission of application would not appear for the exam, that year will also be consider as an opportunity.

5. Consequences of failure to pass the examination :—

(1) if the person appointed by nomination to the post of Gazetted Officer and fails to pass the Examination within a period specific in sub-rule (1) of rule 4, then he shall be liable to discharge or terminate from the service; or

(2) If the person appointed by promotion to the post of Gazetted Officer and fails to pass the Examination within a period and chances specified in sub-rule (2) of rule 4 then,—

(a) he shall lose seniority for the purpose of promotion to the higher post, to all the officers who pass the Examination before him. In this case the seniority of this officer should be fixed on the date of passing the Examination or he may exempted under rule 8 ; and

(b) until he passes the examination he shall not be confirmed in the post and shall not be allowed to draw his next increment in the scale of post held by him. Increment soमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१ ११ withheld shall become payable to him with effect from the date on which he passes the Examination or he may be exempted from passing the Examination under rule 8 of these rules. All future increments shall accrue as if no increment is withheld. The arrears for past period shall not be admissible.

6. Commission to Conduct Examination and Medium of Examination.—

(1) The examination shall be conducted by the Commission, and shall be held once in a year preferably in the month of October or November.

(2) The question paper shall be in Marathi and English languages.

7. Grant of extra chances.—The Government may, in exceptional circumstances, at its discretion, grant to a candidate failing to pass the examination within the period mentioned in the rule 4, not more than one extra chance to appear for the examination, if he applies for it, by correspondingly extending the period of probation maximum upto one year beyond the period of two years referred to in rule 4 :

Provided that, the extra chance to appear for the examination shall be availed by the Officer immediately at the next consecutive examination held by the Commission.

8. Exemptions.— An Officer to whom these rules apply shall be exempted from passing the examination if,—

(a) he has already passed the examination under the exiting Departmental Examination Rules ;

(b) he has been exempted from passing such examination under the existing rules ;

(c) any officer who passes the Examination at any of the post mentioned in clause (f) of rule 2 ; he shall not be required to pass the Examination after his promotion to the higher post again ;

(d) he has attained the age of fifty years on the day of issue of these rules and on any day thereafter :

Provided that, exemption under this clause shall not be available to the officers covered by sub-rule (1) of rule 4 of these rules.

9. Syllabus :—

(1) The syllabus for the examination shall be as mentioned in Appendix 'A'.

(2) All question papers will be 100 marks each and of three hours duration. The first three papers will be common to all the officers mentioned in the clause (f) of Rule 2 of these rules;

(3) The fourth paper shall contain three parts namely as Part No. 1, Part No. 2 and Part No. 3.

(a) Part No. 1 shall contain General Administration (Operation and Management) and General Activities of the Directorate of Geology and Mining, Nagpur and it is compulsory for all the officers mentioned in the clause (f) of Rule 2.

(b) Part No. 2 shall contain Mineral Exploration and it shall be compulsory for officers mentioned in clause (g) of rule 2 and

(c) Part No. 3 shall contain Office Administration and it shall be compulsory for officers mentioned in clause (h) of rule 2.

भाग चार-अ----१००-२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१ (4) Paper No. I, II and III may be answered with the aid of books. (with books, government notifications and government resolutions published by the Government of India and the State Government of Maharashtra), Paper No. IV shall be answered without the aid of books (without books).

(5) All the question papers may be answered either in Marathi or in English.

(6) As per change in need and technical up gradation of subjects Government may amend this syllabus by the Government Resolution from time to time.

10. Standard for passing.—The standard for passing the examination shall be 50 percent of all total marks in each paper,

Condonation upto 5% of marks in any one paper shall be granted to a candidate who is thereby able to pass the examination, provided that the candidate appears for all the papers at one and the same time.

11. Credit.– An Officers who passes the examination at first attempt and secures 75 percent or more marks in any paper, shall be considered to have passed the examination with credit and an entry regarding his performance shall be recorded in his confidential report.

12. Exemption in Subjects.—An Officer who fails in the examination but secures 55 percent or more marks in any paper, shall be exempted from appearing and passing again in that paper in his subsequent attempts :

Provided that, such exemption shall be specially claimed by the Officer in writing at the time of appearing for the examination in his subsequent attempts. In the absence of such written application claiming exemption it shall be presumed that the candidate does not wish to avail of the exemption.

13. Application for appearing in the Examination.—An Officer who desires to appear for the examination shall apply in the form prescribed in Appendix 'B' to the Directorate of Geology and Mining, Nagpur.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SATISH GAVAI,

Additional Chief Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१ १३

APPENDIX 'A'

(See Rule 09)

SERVICE RULES AND FINANCIAL RULES

(Compulsory For All the posts)

Question Paper No. 1 Subject Duration For Question Paper-3 Hours Total Marks 100
[1] [2] [3] [4]
A (a) Maharashtra Civil Services (General conditions of Services) Rules, 1981. Chapter I, II, III and V and appendices relating to these Chapters (b) Maharashtra Civil Services (pay) Rules, 1981 Chapter I, II, III and V and appendices relating to these Chapters (c) Maharashtra Civil Services (Joining time Foreign Services and Payment during Suspension Dismissal and Removals ) Rules, 1981 Chapter I, II, III and V and appendices relating to these Chapters (d) Maharashtra Civil Services (Leave) Rules, 1981. Chapter I, II, III, IV, V and VI and appendices relating to these Chapters (e) Maharashtra Civil Services (Pension) Rules, 1982 Chapter I, II and III and appendices relating to these Chapters. (f) (DCPS) Defined Contribution Pension Scheme. (g) General Provident Fund Rules, 1998 (h) Office Procedure for Purchase of Stores by the Government Departments (Procedure of E-Auction and E-Tendering) B The Bombay Financial Rules, 1959 (Edition 1972 Chapter 1, 2, 3, 4, 5, 6, 10, 11 and 12 C Maharashtra Contingent Expenditure Rules, 1965 (Financial Publication No.V) Entire book excluding section XII Item (ii) and (iii) of section XXVI, XXVIII, XXIV, XXX, XXXI, XXXII and XXXIII of Part II. D Maharashtra Budget Manual (Financial Publication No.VI) Chapters I, II,III,VIII, X, XII, XIII, XIV, XV and XVI and appendices relating to these Chapters. E Maharashtra Government Employee Transfer Regulation Act, 2005 (With Books) (All the above Rules as amended up to date and notifications issued there under from time to time by Government.)
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१

THE MINES AND MINERAL REGULATION AND

DEVELOPMENT ACT & OTHER RULES ETC.

Question Paper No. 2 Subject Duration For Question Paper-3 Hours Total Marks 100
[1] [2] [3] [4]
1 The Mines & Mineral Development & Regulation (Amendment) Act, 2015. 2 Mineral (Evidence of Mineral Content) Rules, 2015. 3 Mineral (Auction) Rules, 2015. 4 Mineral (Non-exclusive Reconnaissance Permits) Rules, 2015. 5 Mineral (Other than Atomic and Hydrocarbon Energy Mineral) Concession Rules, 2016. 6 Pradhan Mantri Khanij Kalyan Kshetra Yojna (PMKKKY). 7 Mineral Conservation & Development Rules, 1988. 8 National Mineral Exploration Trust Rules, 2015. 9 Maharashtra Minor Mineral Extraction (Development & Regulation) Rules, 2013. 10 Maharashtra Mineral (Prevention of Illegal Mining Transportation & storage) Rule, 2001. 11 Forest Conservation Act, 1980 with amendment made in 1988. 12 Environment (Protection) Act, 1986. 13 District Mineral Foundation Rules, 2016. (With Books) (All the above Acts & Rules as amended up to date & notifications & orders issued thereunder from times to time by the Central Government & Government of Maharashtra.)

ACTS AND REGULATIONS PERTAINING TO

INDUSTRIES AND OTHER MINERALS AND MINES

(Compulsory For All the posts)

Question Paper No. 3 Subject Duration For Question Paper-3 Hours Total Marks 100
[1] [2] [3] [4]
1 Industrial Policy Resolution dated 30th April 1956. 2 Industries (Development & Regulation) Act, 1957 & Rules thereunder. 3 Coal Mines (Special Provision) Act, 2015. 4 Atomic Energy Amendment Act, 2015. 5 The Coal Mines (Conservation & Development) Act, 1974. 6 Petroleum & Natural Gas Rules, 2008. 7 The Mines Act, 1952 & Mines (Amendment) Act, 1969 8 The Indian Metalliferous Mines regulations, 2012 (With Books) (All the above acts & Rules as amended up to date & notifications & orders issued thereunder from times to time by the Central Government & Government of Maharashtra.)
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१ १५

Question Paper No. 4

(Duration of Question Paper 3 Hours, Total Marks 100)

Part No. 1

GENERAL ADMINISTRATION OPERATION AND

MANAGEMENT AND GENERAL ACTIVITIES OF

THE DIRECTORATE

(Compulsory For All the posts)

Subject

1 The Maharashtra Civil Services (Conduct ) Rules, 1979.

2 The Maharashtra Civil Service (Discipline and Appeal) rules ,1979.

3 Manual of Office Procedure

4 O and M.

5 General activities of the directorate and Office standing Orders issued by

Director of Geology and Mining.

6 Noting and drafting.

7 Manual of departmental enquiries.

Part-2

MINERAL EXPLORATION

(Only For the Technical posts)

1 Operating Manual of Drills available in the Department.

2 General Methods of Drilling & types of drilling machines.

3 General Principles of Survey, Prospecting & Exploration of Minerals.

4 Orders & circulars issues by the director of Geology & Mining with regard

to drilling operations geological surveys mineral exploration & regarding

working of frills pumping sets & other equipments.

Part-3

OFFICE ADMINISTRATION

(Only For the post of Administrative Officer and Assistant

Administrative Officer)

1 Printing and Stationery Manuals.

2 Reservations and other concessions in government Services for backward

Classed.

3 Maharashtra Official Language Act, 1964 and Rules and other orders

thereunder.

4 Administrative Powers delegations decentralization of Powers Administrative responsibility and Administrative law techniques of supervision Control

Co-ordination.

5 Administrative Public Relations, administrative publicity etc.

6 Right to Information Act, 2005 and the Role of public Information Officer

and 1st Appellate Authority.

7 Right to Service Act, 2015.

(Without Books)

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१

APPENDIX 'B'

(See Rule 13)

'An application form for the admission for the Departmental Examination of

Officers on the establishment of Directorate of Geology and Mining, Nagpur.'

Year——————.

Part – A

1. Name of the applicant :-

2. Name of the Post :-

3. Name of the Office :-

4. Date of Appointment :-

5. Has the applicant secured exemption under rule 12 in any of Papers ?

If yes, Furnish the following particulars :-

(a) Year in which appeared for the examination :-

(b) Roll Number :-

(c) Paper / Papers in which exempted :-

(d) Percentage of marks obtained in each paper :-

Date :

Signature of Applicant.

Part B

Above particulars furnished by the applicant has been verified and found to be correct.

Date :

Office Seal

Administrative Officer

Directorate of Geology and Mining, Nagpur.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 April 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-04-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-04-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.