Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext. No. 148 (8th June 2021) नगरविकास विभाग, क्र. कडोंम-1019/प्र.क्र. 139/नवि-28

Published 08 June 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-06-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ७, अंक ६९] मंगळवार, जून ८, २०२१/ज्येष्ठ १८, शके १९४३ [पृष्ठे ६०, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १४८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

नगरविकास विभाग

४ था मजला (मु(cid:१७६)य इमारत), मंत्रालय, हुतात्मा राजगुरू चौक,

मादाम कामा मार्ग, मु ंबई ४०० ०३२, दिनांक ०७ जून २०२१.

अधिसूचना

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम.

क्रमांक कडोंम-१०१९/प्र.क्र. १३९/नवि-२८.– महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ४५६ (अ) व या अधिनियमातील लागू असलेल्या अन्य तरतुदी(cid:४६२)ारे मिळालेल्या शक्तींचा वापर करून, कल्याण-डोंबिवली महानगरपालिके च्या अंमलात असलेले सध्याचे सर्व सेवा प्रवेश नियम, तत्संबंधात यापूर्वी करण्यात आलेले ठराव व आदेश तसेच कल्याण-डोंबिवली शहर महानगरपालिका सेवा (सेवा भरती व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०१० यांचे अधिक्रमण करून, महाराष्ट्र शासन, या(cid:४६२)ारे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ४५७ (३) अनुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिके च्या विविध पदांवर करावयाच्या नियुक्त्यांचे नियमन व सेवांचे वर्गीकरण करण्यासाठी खालीलप्रमाणे नियम करीत आहे :—

नियम

१. संक्षिप्त नाव, प्रारंभ व व्याप्ती :—

(१) या नियमांना "कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२१" असे संबोधण्यात येईल.

(२) हे नियम शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून अंमलात येतील.

(३) हे नियम कल्याण-डोंबिवली महानगरपालिके च्या सर्व मंजूर पदांवरील नियुक्त्यांना लागू होतील; मात्र, अन्यथा नमूद के ले नसल्यास, अंशकालिक स्वरूपाच्या नियुक्त्या, कं त्राटी पद्धतीने किंवा रोजंदारी त(cid:४५१)वावरील नियुक्त्या तसेच मानसेवा स्वरूपाच्या नियुक्त्यांना लागू होणार नाहीत.

२. व्या(cid:१७६)या :—

विषय किंवा संदर्भानुसार अन्य अर्थ अभिप्रेत नसल्यास, या नियमांसाठी,–

भाग चार-ब–१४८-१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ (१) "शासन" म्हणजे, महाराष्ट्र शासन. (२) "अधिनियम" म्हणजे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम. (३) "आयोग" म्हणजे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. (४) "महानगरपालिका" म्हणजे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदी अन्वये निर्माण के लेली "कल्याण-डोंबिवली महानगरपालिका."

(५) "महापौर" म्हणजे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिके चे महापौर. (६) "आयुक्त" म्हणजे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम-३६ अन्वये शासनाने नियुक्त के लेला अधिकारी.

(७) "सक्षम प्राधिकारी" म्हणजे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिके चे आयुक्त. (८) "नियुक्ती प्राधिकारी" म्हणजे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम-५३ च्या पोट-कलम (१) ते (३) च्या तरतुदींप्रमाणे नियुक्ती देण्यास सक्षम असलेला अधिकारी.

(९) "निवड प्राधिकारी" म्हणजे, या नियमातील परिशिष्ट-(१) मध्ये विनिर्दिष्टीत के लेली कर्मचारी निवड समिती. (१०) "अधिकारी/कर्मचारी" म्हणजे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील प्रकरण-४, कलम-५१ (४) अन्वये नेमणूक के लेले अधिकारी/कर्मचारी. परंतु, यात रोजंदारीवर, हजेरीपटावर असलेले कामगार आणि कं त्राटी पद्धतीने, तसेच अंशकालीन व मानद स्वरुपी नेमण्यात आलेल्या व्यक्तींचा समावेश होत नाही. (११) "संवर्ग" म्हणजे, एखाद्या सेवेतील किंवा एखाद्या सेवेच्या भागातील स्वतंत्र घटक म्हणून मंजूर के लेल्या "कायम त्याचप्रमाणे हंगामी" शासनमान्य पदांचा समूह.

(१२) "कलम" म्हणजे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम. (१३) "परिशिष्ट" म्हणजे, या नियमांना जोडलेले परिशिष्ट. (१४) "जोडपत्र" म्हणजे, या नियमांना जोडलेले जोडपत्र. (१५) "अनुसूची" म्हणजे, या नियमांना जोडण्यात आलेली अनुसूची. (१६) "विभागीय परीक्षा" म्हणजे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिके च्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विहित के लेली व या नियमांच्या परिशिष्ट-(३) मध्ये नमूद करण्यात आलेली विभागीय परीक्षा.

(१७) "पदवी" म्हणजे, संसदेच्या अधिनियमा(cid:४६२)ारे किंवा भारतातील राज्य विधिमंडळा(cid:४६२)ारे विधि संस्थापित असलेले कोणतेही विद्यापीठ किंवा संसदेच्या अधिनियमा(cid:४६२)ारे किंवा तत्सम अधिनियमा(cid:४६२)ारे स्थापना करण्यात आलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेतून प्राप्त के लेली पदवी.

(१८) "पदविका" म्हणजे, संसदेच्या अधिनियमा(cid:४६२)ारे किंवा भारतातील राज्य विधिमंडळा(cid:४६२)ारे विधि संस्थापित असलेले कोणतेही विद्यापीठ किंवा तंत्र शिक्षण मंडळ किंवा संसदेच्या अधिनियमा(cid:४६२)ारे किंवा तत्सम अधिनियमा(cid:४६२)ारे स्थापना करण्यात आलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेतून/तंत्र निके तनातून प्राप्त के लेली पदविका.

(१९) "व्यावसायिक अर्हता (Professional Qualification)" म्हणजे, अग्निशमन अभियांत्रिकी पदवी (B.E.

Fire), अग्निशमन अभियांत्रिकी उच्च शिक्षा पदविका (Advanced Diploma in Fire Engineering), अग्निशमन अभियांत्रिकी पदविका (Diploma in Fire Engineering) उप अग्निशमन अधिकारी हे पा(cid:५०४)क्रम [राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण अकादमी, मु ंबई मधून उत्तीर्ण झालेले अथवा Institute of Fire (U.K.) किंवा (India) या संस्थेमधून M.I. (Fire) किंवा Grade (I) (Fire) उत्तीर्ण झालेले.]

(२०) "स्वीयेतर सेवा (Foreign Service)" म्हणजे, ज्या सेवेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिके च्या कर्मचाऱ्याला त्यांचे वेतन व भत्ते महानगरपालिके च्या निधी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही साधना(cid:४६२)ारे मिळतात, अशी सेवा.

(२१) "मुलाखत" म्हणजे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिके च्या पदावरील/पदांवरील नियुक्तीकरिता अर्ज के लेल्या उमेदवाराची सक्षम निवड प्राधिकाऱ्याने किंवा त्याच्या स्वत:च्या सदस्यांमधून अशा प्राधिकरणाने नामनिर्देशित के लेल्या एखाद्या समितीने आणि ज्या पदांकरिता त्याने किंवा तिने अर्ज के ला आहे, त्या पदांवरील नियुक्तीकरिता निवड करण्यासाठी अशा रितीने मुलाखत घेण्यात आलेल्या उमेदवारांची योग्यता किंवा अन्यथा मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने आणि अशा मुलाखत घेण्यात आलेल्या उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे अनुक्रम लावण्यासाठी घेतलेली मुलाखत, असा आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ ३

(२२) "समतुल्य/समकक्ष अर्हता" म्हणजे, संबंधित अर्हतेला समान म्हणून शासनाकडून जाहीर के लेली अर्हता, असा आहे आणि याबाबत कोणताही संदेह/वाद उद्भवल्यास शासनाचा निर्णय अंतिम असेल.

(२३) "मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था" म्हणजे, शासनाची मान्यता असलेली संस्था, असा आहे. (२४) "मान्यताप्राप्त विद्यापीठ" म्हणजे, सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता असलेले विद्यापीठ, असा आहे. (२५) "माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा" म्हणजे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेली शालांत प्रमाणपत्र परीक्षा, असा आहे आणि यात शासनाने या परीक्षेशी समान म्हणून जाहीर के लेल्या कोणत्याही इतर परीक्षेचा समावेश आहे.

(२६) "औद्योगिक प्रशिक्षण संस्था" म्हणजे, राज्य शासनाने विविध प्रकारच्या औद्योगिक व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यासाठी तयार के लेले औद्योगिक प्रशिक्षण कें द्र.

(२७) "समय श्रेणी वेतन" म्हणजे, असे वेतन जे, या नियमात घालून देण्यात आलेल्या कोणत्याही शर्तीच्या अधीन किमान पासून कमाल पय(cid:५२२)त नियतकालिक वेतनवाढीने वाढते.

(२८) "लेखी परीक्षा" म्हणजे कल्याण-डोंबिवली महानगरपालिके कडून, योग्य रितीने नामनिर्देशित करण्यात आलेल्या एखाद्या अभिकरणाकडून, पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या योग्यतेचे किंवा अन्यथा मूल्यमापन करण्याच्या प्रयोजनाकरिता घेतलेली परीक्षा आणि त्या लेखी परीक्षेतील उमेदवारांच्या कामगिरीचा संबंध असेल, तेथवर त्यांच्या गुणवत्तेचा क्रम लावण्याच्या उद्देशाने घेतलेली परीक्षा, असा आहे. (२९) "व्यावसायिक परीक्षा" म्हणजे, उमेदवारांच्या तांत्रिक कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिके ने एखाद्या अभिकरणाकडून अथवा शासकीय/ निमशासकीय कार्यालयामार्फ त आयोजित के लेली परीक्षा, असा आहे.

(३०) "निवड समिती अध्यक्ष" म्हणजे, कर्मचारी/अधिकारी निवड समितीसाठी सक्षम प्राधिकारी यांनी निवड समिती अध्यक्ष म्हणून नियुक्त के लेले अधिकारी.

(३१) "एकीकृ त संवर्ग" म्हणजे, विविध पदांच्या कर्तव्याचे स्वरुप, ती पदे धारण करण्यासाठी विहित के लेली शैक्षणिक अर्हता, अनुभव व वेतनश्रेणी यांचा सारासार विचार करून सेवा नियमासाठी एकीकृ त के लेला संवर्ग.

(३२) "अर्हताप्राप्त कर्मचारी" म्हणजे, नियमाच्या परिशिष्ट-(२) मध्ये विहित के लेली अर्हता धारण करणारे कर्मचारी.

या नियमांत वापरण्यात आलेल्या, परंतु व्या(cid:१७६)या न के लेल्या शब्द किंवा शब्द समुहांचा अर्थ अधिनियमात दिल्यानुसार असेल.

३. सेवांचे वर्गीकरण (Classification of Services) :–

(३.१) प्रशासकीय सेवा :– सामान्य प्रशासन, परिमंडळ कार्यालय प्रशासन, प्रभाग प्रशासन, कर व महानगरपालिका सचिवालय अंतर्गत असलेल्या विभागातील सेवा या "प्रशासकीय सेवा" संबोधण्यात येतील.

(३.२) लेखा सेवा व लेखा परीक्षण सेवा :– महानगरपालिके च्या आर्थिक व्यवस्थापनाशी संबंधित (अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण, लेखा आक्षेप निराकरण व खर्च व्यवस्थापन इत्यादी) सेवांतील पदांना "लेखा संवर्ग व लेखापरीक्षण संवर्ग" असे संबोधले जाईल व अशा पदांची सेवा "लेखा सेवा व लेखापरीक्षण सेवा" संबोधण्यात येईल.

(३.३) तांत्रिक सेवा :– ज्या पदावरील नियुक्तीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी/ पदविका, सांविधिक विद्यापीठ/अभिमत विद्यापीठ/राज्य तंत्रशिक्षण मंडळ (Board of Technical Education) वा कें द्रीय तंत्र शिक्षण मंडळ (Board of Central Technical Education), तंत्र शिक्षण परिषद (Technical Council) यांचेमार्फ त चालविले जाणारे विविध तांत्रिक व अभियांत्रिकीविषयक अभ्यासक्रम अशी किमान शैक्षणिक अर्हता विहित के ली असेल अशा पदांची सेवा "तांत्रिक सेवा" संबोधण्यात येईल.

(३.४) वैद्यकीय सेवा :– ज्या पदावरील नियुक्तीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वैद्यकीय शास्त्राचा पदवीधारक, पदव्युत्तर पदवीधारक/पदविकाधारक, तसेच मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, आयुष वा तत्सम आयुर्वेदिक कौन्सिल, युनानी, होमिओपॅथिक कौन्सिल यांच्याकडील नोंदणी ही किमान शैक्षणिक अर्हता विहित के ली असेल, अशा पदांची सेवा "वैद्यकीय सेवा" संबोधण्यात येईल.

भाग चार-ब–१४८-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ (३.५) निमवैद्यकीय सेवा :– वैद्यकीय सेवेतील पदांना सहा(cid:२००)यकारी असणाऱ्या पदांच्या संवर्गाला, उदा.अधिसेविका, सहा(cid:२००)यक अधिसेविका, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, भौतिकोपचार तज्ञ, व्यवसायोपचार तज्ञ, दंत आरोग्य तज्ञ, औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी इत्यादी पदांच्या सेवेला "निमवैद्यकीय सेवा" संबोधण्यात येईल.

(३.६) सार्वजनिक आरोग्य सेवा :– घनकचरा व्यवस्थापन विभागाशी संबंधित अधिकारी/कर्मचारी- उदा. मु(cid:१७६)य स्वच्छता अधिकारी, उप मु(cid:१७६)य स्वच्छता अधिकारी, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, उप स्वच्छता निरीक्षक, मुकादम आणि सफाई कामगार व तत्सम पदांच्या सेवेला "सार्वजनिक आरोग्य सेवा" संबोधण्यात येईल.

(३.७) अग्निशमन संवर्ग आणि सेवा :– महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा उपाययोजना अधिनियम, २००७ मध्ये समाविष्ट असलेल्या सेवेला "अग्निशमन सेवा" संबोधण्यात येईल.

४. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सेवांचे गट पुढीलप्रमाणे असतील :–

(१) अधिकारी- गट-अ व गट-ब.

(२) कर्मचारी- गट-क व गट-ड.

५. नेमणुकीची पद्धत व अर्हता :–

(५.१) नियुक्तीची पद्धत :– महानगरपालिके तील विविध पदांवर नियुक्तीची कार्यपद्धती परिशिष्ट-(१) मध्ये विहित के ल्यानुसार व शिक्षण, अनुभव इत्यादी आवश्यक अर्हता परिशिष्ट-(२) मध्ये विहित के ल्याप्रमाणे असतील.

नियुक्तीची पद्धत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम-५४ व अनुसूची-ड मधील प्रकरण-३ नुसार असेल.

(५.२) भारतीय नागरिकत्व आणि महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र :– उमेदवार भारताचा नागरिक असावा आणि महाराष्ट्रात १५ वर्ष अधिवास (Domicile) करीत असल्याबाबत त्याने सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रात जन्म झाल्याबाबत जन्म दाखला अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील.

(५.३) संगणक हाताळणी/वापराबाबतच्या ज्ञानाची आवश्यकता :– परिशिष्ट-(२) मध्ये विहित के लेल्या अर्हतेव्यतिरिक्त गट-ड वगळता इतर पदांवरील नेमणुकीसाठी शासन वेळोवेळी आदेश काढून निश्चित करेल, असे संगणक हाताळणी/वापराबाबतचे ज्ञान (महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मु ंबई यांचेकडील अधिकृ त MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृ त CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इत्यादी), एक अतिरिक्त आवश्यक अर्हता असेल.

(५.४) वयोमर्यादा :– महानगरपालिके तील कोणत्याही पदावर नामनिर्देशनाने नियुक्तीसाठी किमान वयाची अट १८ वर्षे पूर्ण व कमाल वयोमर्यादा महाराष्ट्र शासनाचे प्रचलित नियम व त्या अनुषंगाने वेळोवेळी काढण्यात आलेले शासन निर्णयात नमूद के ल्यानुसार असेल. कल्याण-डोंबिवली महानगरपालिके त विहित प्रक्रिये(cid:४६२)ारे व शासनमान्य पदावर नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नसेल. जेथे कमाल वयोमर्यादा विहित के ली नसेल, अशा पदांच्याबाबत ती प्रचलित शासन धोरणाप्रमाणे असेल. सामाजिक आरक्षण लागू असणाऱ्या प्रवर्गाकरिता प्रचलित शासन निर्णयानुसार वयोमर्यादा शिथिलक्षम असेल.

(५.५) पदोन्नती व नामनिर्देशना(cid:४६२)ारे करावयाच्या नियुक्त्यांचे प्रमाण :–

(क) नामनिर्देशन वा पदोन्नतीचे प्रमाण परिशिष्ट-(२) मध्ये संबंधित पदासमोर दर्शविल्यानुसार असेल. तथापि, ज्या पदासमोर असे प्रमाण विहित के लेले नसेल, अशा पदावरील नियुक्तीसाठी पदोन्नती व नामनिर्देशनाचे प्रमाण ५०:५० असे राहील.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ ५

(ख) पदोन्नतीच्या साखळीतील एकाकी पद सामान्यत: पदोन्नतीने भरण्यात येईल. तथापि, विशिष्ट अर्हता आवश्यक असलेल्या एकाकी पदावर पदोन्नतीने नियुक्तीसाठी उमेदवार उपलब्ध नसल्यास तसे पद प्रतिनियुक्तीने भरता येईल. तरीही उमेदवार उपलब्ध होत नसल्यास एखाद्या विशिष्ट प्रकरणी सदर पद शासन मान्यतेने नामनिर्देशन/सरळसेवेने भरता येईल.

६. पदोन्नतीने नेमणूक करणे :–

पदोन्नतीने करावयाची कोणतीही नियुक्ती, ज्येष्ठता-नि-पात्रता या त(cid:४५१)वावर अर्हताप्राप्त कर्मचाऱ्यांमधून के ली जाईल.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम-४५ अंतर्गत येणारी पदे तसेच वर्ग-१ ची इतर सर्व पदे पदोन्नतीने भरताना, सर्वसाधारण सभेच्या ठरावानंतर त्यास शासनाची पुर्वमंजुरी घेतल्यानंतरच पदोन्नतीने भरता येतील.

७. प्रतिनियुक्ती(cid:४६२)ारे नेमणूक :–

या नियमांमध्ये विहित के लेल्या अर्हतेनुसार महानगरपालिके तील ज्या पदांवर प्रतिनियुक्ती(cid:४६२)ारे नेमणूक करण्याची तरतूद आहे, अशी पदे कें द्र शासन, राज्य शासन, इतर स्थानिक स्वराज्य संस्था व स्थानिक प्राधिकरणातील अधिकाऱ्यांमधून शासनाच्या प्रचलित धोरणानुसार प्रतिनियुक्तीने भरता येतील. सदर प्रतिनियुक्तीचा कालावधी हा शासनाच्या प्रचलित नियमापेक्षा अधिक असणार नाही. सदर प्रतिनियुक्तीचा कालावधी संपताच संबंधित अधिकारी/कर्मचारी यांची प्रतिनियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.

८. महानगरपालिके तील अधिकारी/कर्मचारी यांच्या बदल्या :–

महानगरपालिके तील अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या बदल्या महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ तसेच या संदर्भात वेळोवेळी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार करणे आवश्यक राहील.

९. एका महानगरपालिके तून दुसऱ्या महानगरपालिके त कायमस्वरुपी बदलीने नियुक्ती :–

या नियमात अन्यत्र काहीही नमूद के ले असले तरी, एका महानगरपालिके तील एखाद्या कर्मचाऱ्याने अन्य महानगरपालिके तील सम संवर्गीय पदावर बदलीने नियुक्तीसाठी अर्ज के ल्यास, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार व दोन्ही महानगरपालिकांतील नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या परस्पर संमतीने मान्य होतील, अशा अटी व शत(cid:५३२)वर, खालील बाबींच्या अधीन राहून कायमस्वरुपी बदलीने नियुक्ती देता येईल.

(अ) पदोन्नतीने भरण्यात येणाऱ्या पदांवर कायमस्वरुपी बदलीने नियुक्ती करता येणार नाही. फक्त नामनिर्देशन/ सरळसेवेने नियुक्तीकरिता राखून ठेवण्यात आलेल्या समसंवर्गीय व समान वेतन श्रेणीच्या रिक्त पदांवर कायमस्वरुपी बदलीने नियुक्ती करण्यात यावी.

(ब) अशी नियुक्ती झाल्यानंतर, त्या पदधारकाची ज्येष्ठता नियुक्तीच्या दिनांकास त्या पदाच्या संवर्गात सर्वात कनिष्ठ (Zero Seniority) राहील.

(क) गट-अ आणि गट-ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीत अन्य महानगरपालिके तून कल्याण-डोंबिवली महानगरपालिके त बदलीचा निर्णय दोन्ही महानगरपालिकांच्या परस्पर संमतीने निश्चित अटी व शत(cid:५३२)वर शासन मान्यतेने घेतला जाईल.

(ड) के वळ विहित प्रक्रिये(cid:४६२)ारे व शासनमान्य पदावर नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांचाच विचार के ला जाईल.

१०. परीविक्षाधीन कालावधी :–

गट-अ आणि गट-ब मध्ये नामनिर्देशन/सरळसेवेने नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांसाठी परीविक्षाधीन कालावधी त्यांच्या नेमणुकीच्या मूळ दिनांकापासून दोन वर्षाचा असेल. राज्य शासनाच्या लागू असलेल्या अटी-शर्तीनुसार परीविक्षाधीन कालावधी पूर्ण के ल्याचे आदेश निर्गमित करण्यात येतील. तसेच अशा उमेदवारांचे परीविक्षाधीन कालावधीतील काम समाधानकारक नसल्यास अपवादात्मक बाब म्हणून आणि तत्संबंधी कारणे नमूद करून परीविक्षा कालावधी पुढील १ वर्षापय(cid:५२२)तच वाढविता येईल. तद्नंतरही या वाढीव कालावधीत काम समाधानकारक नसल्यास सदर कर्मचाऱ्याची सेवा समाप्त करण्यात येईल.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३

११. भाषा परीक्षा, विभागीय परीक्षा व त्याबाबत प्रशिक्षण :–

महानगरपालिका सेवेतील पदांवर नेमणूक करण्यात आलेल्या किंवा त्यासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांनी :– (१) विहित करण्यात येतील अशा भाषा परीक्षा आणि/किंवा चाचण्या उत्तीर्ण होणे किंवा त्यांना विहित नियमानुसार यापैकी कोणतीही परीक्षा पास होण्यापासून सूट मिळविणे आवश्यक असेल.

(२) परिशिष्ट-(३) अन्वये विहित के लेली विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा अशी परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळविणे आवश्यक असेल.

(३) वेळोवेळी ठरवून देण्यात येईल असे, सेवा प्रवेशपूर्व आणि/किंवा सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण घेणेसुद्धा आवश्यक असेल.

१२. महानगरपालिका सेवेतील पदावर नियुक्तीसाठी अनर्हता :–

एखाद्या व्यक्तीस :–

(क) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम-५९ च्या तरतुदीप्रमाणे अनर्ह ठरविण्यात आले असेल, किंवा (ख) महानगरपालिके च्या सेवेतून किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या सेवेतून किंवा कोणत्याही सरकारी सेवेतून गैरवर्तणुकीबद्दल बडतर्फ करण्यात आले असेल, किंवा

(ग) ज्यामध्ये नैतिक अध:पतनाचा समावेश होईल, अशा अपराधाबद्दल तिला दोषी ठरविण्यात आले असेल, किंवा (घ) जर त्याच्या एकापेक्षा अधिक पत्नी हयात असतील आणि स्त्री उमेदवारांच्या बाबतीत जर तिने ज्याची पत्नी हयात आहे अशा व्यक्तीशी विवाह के ला असेल, किंवा

(च) महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कु टु ंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ नुसार अनर्ह ठरत असेल, किंवा (छ) न्यायालयात ज्या गुन्ह्यासाठी कै देची शिक्षा फर्मावता येते, अशा गुन्ह्यासाठी सहा महिन्याहून अधिक मुदतीची कै देची शिक्षा झाली असेल व ती शिक्षा अपील वा पुनरिक्षणात रद्द झाली नसेल, अशी व्यक्ती, किंवा (ज) महानगरपालिके च्या सेवेत असताना सिद्धापराध होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक मुदतीची कै देची शिक्षा झाली असेल व ती शिक्षा अपील वा पुनरिक्षणात रद्द झाली नसेल.

अशी व्यक्ती महानगरपालिके च्या सेवेत नेमणूक देण्यास वा नेमणूक चालू ठेवण्यास अपात्र समजली जाईल.

१३. महानगरपालिका सेवेतील पदांवर आरक्षण :–

महानगरपालिका सेवेतील पदांना शासनाच्या प्रचलित धोरणानुसार आरक्षण लागू असेल. यामध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षण (सामाजिक आरक्षण), विशेष/समांतर आरक्षण, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग, महिला, खेळाडू इत्यादीसाठीच्या आरक्षणाचा समावेश असेल.

१४. शारीरिक पात्रता प्रमाणपत्र आणि चारि(cid:२५८)य पडताळणी अहवाल :–

महानगरपालिका सेवेतील कोणत्याही पदावरील नामनिर्देशन/सरळसेवेने नियुक्ती,

(अ) महानगरपालिके च्या सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे विहित नमुन्यातील आरोग्यविषयक वैद्यकीय प्रमाणपत्र सादर के ल्यानंतर, आणि

(ब) उमेदवाराच्या पूर्वचारि(cid:२५८)य पडताळणीबाबत (Verification of Antecedents) पोलीस विभागाचे/सक्षम प्राधिकाऱ्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर के ली जाईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ ७

१५. परिक्षेकरिता/मुलाखतीकरिता के लेल्या प्रवासाचा खर्च :–

नामनिर्देशन/सरळसेवे(cid:४६२)ारे नियुक्ती करण्याच्या बाबतीत, परिक्षेच्या/मुलाखतीच्या प्रयोजनाकरिता उमेदवारांना करावे लागणारे सर्व प्रवास हे, याबाबतीत काही विनिर्दिष्ट प्रवर्गाच्या उमेदवारांच्या संबंधात वेळोवेळी शासन/महानगरपालिके कडून मंजूर करण्यात आलेल्या कोणत्याही सवलतीच्या अधीन राहून, स्वत:च्या खर्चाने असतील. याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सक्षम प्राधिकारी यांना असेल.

१६. नियुक्तीकरिता निवड झाल्यावर पदस्थापना :–

नियुक्तीकरिता निवड झालेले उमेदवार हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिके च्या हद्दीत कोठेही किंवा कल्याण- डोंबिवली महानगरपालिके च्या हद्दीच्या बाहेर महानगरपालिके चे कार्यालय जेथे असेल तेथे किंवा महानगरपालिका भविष्यकाळात कार्यालय सुरू करू शके ल, तेथे पदस्थापना के ले जाण्यास पात्र ठरतील.

१७. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबावतंत्राचा वापर :–

कोणत्याही उमेदवाराच्या नियुक्तीसंदर्भात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दबाव आणण्याचा के लेला प्रयत्न हा त्या उमेदवाराला त्या पदावरील नियुक्तीसाठी अनर्ह करणारा ठरेल.

१८. हे नियम अस्तित्वात येण्यापूर्वी विहित मार्गाने झालेल्या सरळसेवा नियुक्त्यांना शासनाने अन्यथा वेगळी लेखी कारणे नमूद करून निर्देश दिले नसतील तर या नियमातील तरतुदीमुळे बाधा येणार नाही.

१९. वेळोवेळी सेवाभरती/आरक्षण/वयोमर्यादा/परीविक्षाधीन कालावधी नियमित करणे, इत्यादींबाबत निर्देश देणारे राज्य शासनाने नियम, अधिनियम, निर्णय व न्यायनिर्णय यानुसार या नियमात सुधारणा (Amendment) करण्यात येईपय(cid:५२२)त या शासन निर्णय/न्याय निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येईल.

२०. सरळसेवा/पदोन्नतीने नियुक्त झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने वेळोवेळी विहित के लेले प्रशिक्षण धोरणाची अंमलबजावणी करावी.

२१. या नियमामधील कोणत्याही तरतुदीच्या अर्थविवरणाबाबत शंका उद्भवल्यास सदर बाब शासनाकडे निर्देशित करण्यात येईल व त्याबाबतीत शासनाचा निर्णय हा अंतिम राहील.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३

वैद्यकीय प्रमाणपत्राचा नमुना

[महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ मधील नियम-११ पहा.]

_______________________

मी या(cid:४६२)ारे प्रमाणित करतो/करते की,

कल्याण-डोंबिवली महानगरपालिके च्या ( ) संवर्गातील ( ) या पदावर नेमणूक करण्यासाठी असलेल्या उमेदवारांची तपासणी के ली आणि _________________

त्याला/तिला

अतिरिक्त (सांसर्गिक किंवा अन्य) कोणताही रोग, शारीरिक दौर्बल्य किंवा शारीरिक अपंगत्व असल्याचे आढळले नाही ही गोष्ट ( ) कार्यालयात ( ) म्हणून नेमणुकीसाठी अनर्ह ठरविणार आहे असे मला वाटत नाही.

______________________

श्री./श्रीमती

यांच्या स्वत:च्या निवेदनावरून त्याचे/तिचे वय _____ वर्षे आहे आणि दिसण्यावरून तो/ती सुमारे ____ वर्षे वयाचा/वयाची आहे. त्याला/तिला लस टोचण्यात आली आहे.

___________________

ओळख चिन्हे

___________________

डाव्या हाताच्या अंग(cid:५०४)ाचा ठसा

___________________

वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव

___________________

वैद्यकीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी

वैद्यकीय अधिकाऱ्याचे पदनाम

(शिक्क्यासह)

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ ९

परिशिष्ट-(१)

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२१ अंतर्गत सेवा

भरतीसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती:-

१. अधिकारी/कर्मचारी निवड समिती :–

महानगरपालिका पदांवर नियुक्तीकरिता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम-५४ मध्ये विहित के ल्यानुसार 'कर्मचारी निवड समिती' गठीत करण्यात येईल. सदर समिती गठीत करण्यात आलेल्या दिनांकापासून एक वर्ष कालावधीकरिता अथवा भरती प्रक्रिया पूर्ण होईपय(cid:५२२)तच्या कालावधीकरिता (यातील जो कालावधी कमी असेल, त्या कालावधीकरिता) वैध राहील.

याव्यतिरिक्त, नामनिर्देशन/सरळसेवेने नियुक्ती करताना, मागासवर्गीय तसेच महिला उमेदवारांच्या हितरक्षणासाठी अशा समितीचे सदस्य म्हणून शासनाच्या प्रचलित आदेशानुसार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मुलाखतीच्या वेळेस विशेष निमंत्रित म्हणून बोलावले जाईल.

२. नामनिर्देशन/सरळसेवे(cid:४६२)ारे करावयाच्या नियुक्तीसाठी कर्मचारी निवड समितीची रचना खालीलप्रमाणे

असेल :–

(१) आयुक्त किंवा आयुक्तांनी पदनिर्देशित के लेला अन्य कोणताही अधिकारी -अध्यक्ष

(२) मु(cid:१७६)य लेखा परीक्षक

- सदस्य

(३) संबंधित विभाग प्रमुख

- सदस्य

(४) आयुक्तांनी नामनिर्देशित के लेला मागासवर्गीय प्रवर्गातील अधिकारी - सदस्य

(५) जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी

- सदस्य

(६) जिल्हा समाज कल्याण अधिकारी

- सदस्य

(७) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

- सदस्य

(८) उप आयुक्त (सामान्य प्रशासन)

- सदस्य सचिव व निमंत्रक ३. नामनिर्देशन/सरळसेवे(cid:४६२)ारे नेमणुकीकरिता कार्यपद्धती:-

(३.१) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ त भरावयाची महानगरपालिके मधील पदे निश्चित करून सदर पदे भरण्यासंदर्भात शासनाने निर्देश दिल्यानंतर संबंधित पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ त भरण्याची कार्यवाही करण्यात यावी.

(३.२) सद्यस्थितीत महानगरपालिके तील पदे भरण्यासंदर्भात पुढील कार्यपद्धती अनुसरण्यात यावी:-

(३.२.१) एखाद्या पदावरील नियुक्तीसाठी, ऑनलाईन/वृत्तपत्रातील जाहिरातीला अनुसरून किंवा महानगरपालिके च्या सूचना फलकावरील सुचनेस अनुसरून विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जाचा किंवा सेवा विनियम कें द्राकडून वा शासनाच्या आदेशानुसार अन्य संस्था/कार्यालयाकडून आलेल्या यादीतील उमेदवाराच्या नावाचाच विचार करण्यात येईल.

(३.२.२) उमेदवाराने अर्जात दिलेल्या तपशीलाबाबत अधिक माहिती मागविण्याचा अधिकार आयुक्तांना असेल.

(३.२.३) जाहिरातीत/सेवा विनियम कें द्राकडे पाठविलेल्या मागणी पत्रात लेखी चाचणीचा उल्लेख असल्यास, अशा उमेदवारांना लेखी चाचणी द्यावी लागेल.

(३.२.४) चाचणी परीक्षेत किमान ५०% गुण मिळविण्याच्या मर्यादेच्या अधीन राहून रिक्त पदाच्या तिप्पट एव(cid:५०६)ा उमेदवारांना वरील (३.२.३) च्या निर्णयाप्रमाणे चाचणी परीक्षा न घेतल्यास, अशा सर्व निर्देशित पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल व अशा उमेदवारांची यादी निवड भाग चार-ब–१४८-२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ समितीच्या प्रत्येक सदस्यास मुलाखतीच्या वेळी पुरविण्यात येईल. परंतु, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/विमुक्त जाती व भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्ग/सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५०% ऐवजी ४५% गुण मिळविण्याची अट राहील.

(३.२.५) मुलाखतीत खालील बाबींवर विशेष लक्ष दिले जाईल:-

(अ) सामाजिक प्रश्नाबाबतची जाणीव.

(ब) पुर्वानुभव :- ज्या पदावर नेमणूक द्यावयाची त्या पदासाठी आवश्यक असा अनुभव.

(क) सेवा भरती नियमात विशेष अर्हता वा इतर कोणत्याही बाबतीत प्राधान्य नमूद असल्यास त्यासाठी द्यावयाचे गुण.

(३.२.६) यानंतर निवड समिती एकू ण गुण लक्षात घेऊन गुणांच्या उतरत्या क्रमाने उमेदवारांची यादी तयार करील व ती आयुक्तांकडे गोपनीयरित्या बंद लिफा(cid:१९६)यात सादर करील.

(३.२.७) भरती प्रक्रियेसाठी सामान्य प्रशासन विभागाने वेळीवेळी दिलेले निर्देश लागू राहतील.

४. पदोन्नतीने नेमणुकीकरिता कार्यपद्धती :–

(४.१) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.एसआरव्ही-२०१८/प्र.क्र.१५९/का.१२, दिनांक ०१ ऑगस्ट, २०१९ मध्ये तसेच वेळोवेळी शासनाच्या प्रचलित निर्णयान्वये दिलेल्या निर्देशाप्रमाणे दरवर्षी पदोन्नतीची प्रक्रिया विहित कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.

(४.२) प्रत्येक वर्षी १ सप्टेंबर ते ३१ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक संवर्गात पदोन्नतीने किती पदे भरावी लागणार आहेत, याचा आढावा सामान्य प्रशासन विभागातर्फे जून महिन्यात आयुक्तांना सादर करतील.

(४.३) उपरोक्त शासन परिपत्रकानुसार कार्यवाही करताना, पदोन्नतीने भरावयाच्या पदांची सं(cid:१७६)या निश्चित झाल्यावर आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून ज्येष्ठतानुक्रमाने पदांच्या सं(cid:१७६)येच्या तिप्पट (१:३) कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीच्या विचारक्षेत्रात (Zone of Consideration) समावेश करण्यात येईल.

(४.४) विभागीय चौकशी सुरू असलेल्या तसेच निलंबित असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्याची नावे ज्येष्ठतानुक्रमाने यादीत येत असल्यास, त्यांची नावे यादीतून वगळण्यात येऊ नयेत. त्यांच्या नावाचा विचार के ल्यावर निवड समितीचा अभिप्राय त्यांच्या नावासमोर नोंदविण्यात येईल.

(४.५) पदोन्नतीसाठी पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांचा निवडसूचीत ज्येष्ठतेनुसार समावेश करण्यात येईल.

(४.६) निवड समिती कर्मचाऱ्यांचे मागील ५ वर्षांचे गोपनीय अहवाल आणि त्यांचेपुढे ठेवलेली इतर कागदपत्रे यांचे अवलोकन करून कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या योग्यतेबद्दल निर्णय घेईल. मात्र असा निर्णय एकमताने झाला नाही, तर त्याबद्दलचा अंतिम निर्णय समिती प्रमुखाचा असेल.

(४.७) कर्मचाऱ्यांच्या निवडीसंबंधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अधिक माहितीची आवश्यकता वाटल्यास अशी माहिती मागविण्याचा समितीस अधिकार असेल.

५. वरील (३) व (४) नुसार निवड समितीने के लेली शिफारस महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम-५३ (१), ५३ (२) वा ५३ (३) नुसार संबंधित सक्षम नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी ठेवली जाईल.

६. तयार करण्यात आलेली निवडसूची त्या-त्या निवडसूचीच्या वर्षासाठी वैध असेल.

७. समिती सचिव बैठकीचा कार्यवृत्तांत तयार करून त्यास समितीची मान्यता घेण्यास जबाबदार असेल. सदस्यांना सादर के लेली सर्व कागदपत्रे परत घेऊन ती एकत्रित जतन करण्याची जबाबदारी समिती सचिवाची असेल.

८. गट-क आणि गट-ड मध्ये सेवा भरती करताना सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.

न्याप्र-१००३/९९/प्र.क्र.२/०३(भाग-२)/१६अ, दिनांक २५ ऑक्टोबर, २००५ अन्वये एकत्रित मार्गदर्शक तत्वांचा लागू असेल तेथे अवलंब करण्यात यावा. या मार्गदर्शक तत्वांमध्ये वेळोवेळी होणारे बदलही अंमलात आणण्यात यावेत.

९. गट-क व गट-ड मधील अनुकं पाच्या भरावयाच्या पदांसाठी आयुक्तांच्या शिफारशीने व शासन मान्यतेने अधिसं(cid:१७६)य पदे निर्माण करता येतील.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ ११

भाग चार-ब–१४८-२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ १३ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ १५ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ १७

भाग चार-ब–१४८-३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ १९

भाग चार-ब–१४८-३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ २१ २२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ २३ २४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ २५

भाग चार-ब–१४८-४२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ २७

भाग चार-ब–१४८-४अ२८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ २९ ३० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ ३१ ३२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ ३३

भाग चार-ब–१४८-५३४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ ३५

भाग चार-ब–१४८-५अ३६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ ३७ ३८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ ३९ ४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ ४१

भाग चार-ब–१४८-६४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ ४३

भाग चार-ब–१४८-६अ४४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ ४५ ४६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ ४७ ४८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ ४९

भाग चार-ब–१४८-७५० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३

परिशिष्ट-(३)

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी विभागीय परीक्षा नियम, २०२१

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (सन १९४९ चा मु ंबई अधिनियम क्रमांक-५९) च्या कलम-४६५, पोटकलम-(१) खंड (ल) च्या तरतुदींनुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिके साठी के लेले नियम :---

नियम

१. संक्षिप्त शीर्षक व नियम लागू होण्याचा दिनांक :-

(अ) या नियमास "कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी (अर्हताकारी विभागीय परीक्षा) नियम, २०२१" असे संबोधण्यात येईल.

(ब) शासन राजपत्रात प्रसिद्ध होतील, त्या तारखेपासून हे नियम अंमलात येतील.

२. व्या(cid:१७६)या:- विषयांत किंवा संदर्भानुसार अन्य अर्थ अभिप्रेत नसल्यास या नियमानुसार,

(२.१) "अधिनियम" म्हणजे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम.

(२.२) "महानगरपालिका" म्हणजे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदी अन्वये निर्माण के लेली "कल्याण-डोंबिवली महानगरपालिका."

(२.३) "आयुक्त" म्हणजे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम-३६ अन्वये शासनाने नियुक्त के लेला अधिकारी.

(२.४) "कर्मचारी" म्हणजे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील प्रकरण-४, कलम-५१ (४) अन्वये नेमणूक के लेले अधिकारी/कर्मचारी. परंतु, यात रोजंदारी, हजेरीपटावर असलेले कामगार आणि कं त्राटी पद्धतीने तसेच, अंशकालीन व मानद स्वरुपी नेमण्यात आलेल्या व्यक्तींचा समावेश होत नाही.

(२.५) "परिशिष्ट" म्हणजे, या नियमांना जोडलेले परिशिष्ट.

(२.६) "विभागीय परीक्षा" म्हणजे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिके च्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विहित के लेली व या नियमांच्या परिशिष्ट- (३) मध्ये नमूद करण्यात आलेली विभागीय परीक्षा.

ज्या शब्दांची वा शब्दसमुहांची व्या(cid:१७६)या या नियमांत समाविष्ट करण्यात आली नसेल, त्यांचा अर्थ अधिनियमात ते ज्या अर्थाने वापरले असतील तसा समजण्यात येईल.

३. विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य :-

(३.१) हे नियम अस्तित्वात आल्याच्या तारखेस कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील स्थायी/अस्थायी स्वरुपात कोणत्याही पदावर नियुक्त असलेल्या व त्या तारखेनंतर नियुक्त होणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना परिशिष्ट-(३) च्या (ब) व (क) मध्ये विहित के लेली आवश्यक ती विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल.

(३.२) उपरोक्त परिशिष्ट-(३) (अ) मध्ये ज्या संवर्गाचा उल्लेख आलेला नसेल, त्या संवर्गातील अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक ज्ञानाची लेखी व तोंडी परीक्षा आयुक्तांच्या मान्यतेने घेतली जाईल. याकरिता किमान तीस दिवसांपेक्षा कमी नाही एव(cid:५०६)ा कालावधीची पुर्वसूचना संबंधितांस देण्यात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ ५१

४. कालावधी आणि संधीची सं(cid:१७६)या:-

(४.१) शासन राजपत्राच्या दिनांकापूर्वी नियुक्त के लेल्या व्यक्तींकरिता कालावधी व संधीची सं(cid:१७६)या या नियमांच्या अधीन राहून, शासन राजपत्राच्या दिनांकापूर्वी महानगरपालिका कर्मचारी म्हणून नियुक्त झालेल्या व सध्या अस्तित्वात असलेल्या नियमान्वये परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या व्यक्तीने, तिला परीक्षा उत्तीर्ण होण्यामधून नियम-१० अन्वये सूट दिलेली नसेल, तर शासन राजपत्राच्या दिनांकापासून ३ वर्षांच्या आत व २ संधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

(४.२) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२१ नुसार नियुक्त कर्मचाऱ्यांनी त्यांची नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून ४ वर्षात ३ संधीमध्ये विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

५. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मानक :-

(५.१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिके तर्फे आयोजित के ल्या जाणाऱ्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक प्रश्नपत्रिके च्या एकू ण गुणांच्या किमान ४०% गुण मिळवणे आवश्यक असेल.

(५.२) प्रत्येक संवर्गासाठी विहित करण्यात आलेल्या सर्व विषयांत वरील तरतुदीच्या आधारे एक वा एकापेक्षा अधिक संधीत उत्तीर्ण झाल्यावरच विभागीय परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समजण्यात येईल.

६. परीक्षेचे वेळापत्रक :-

विभागीय परीक्षा व मराठी भाषा परीक्षा या सक्षम प्राधिकारी यांनी विहित के लेल्या अभिकरणाकडून सर्वसाधारणपणे दरवर्षी प्रशासनाच्या/अभिकरणाच्या सोयीनुसार अशा परीक्षा मे ते जून महिन्यात घेतल्या जातील.

७. परीक्षेचा अभ्यासक्रम :-

विभागीय परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम परिशिष्ट- (३) (ब) मध्ये विहित के ल्याप्रमाणे किंवा शासनाने वेळोवेळी विहित के ल्यानुसार असेल.

परंतु, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्था, नाशिक यांच्याकडून अभियांत्रिकी विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी विहित के लेल्या परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम त्या परीक्षा घेणाऱ्या प्राधिकाऱ्यांकडून जाहीर के ल्याप्रमाणे असेल.

८. प्रशिक्षण :-

विभागीय परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी परीक्षेपूर्वी किमान ४० तासांचा प्रशिक्षण कार्यक्रम कल्याण- डोंबिवली महानगरपालिके कडून आयोजित करण्यात येईल.

९. परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास होणारे परिणाम :-

एखादा कर्मचारी नियम-४ मध्ये विनिर्दिष्ट के लेल्या कालमर्यादेत आणि संधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण झाला नाही तर पुढील परिणाम होतील :-

(९.१) तो परीक्षा उत्तीर्ण होईपय(cid:५२२)त किंवा नियम-१० अन्वये परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून त्यास सूट मिळेपय(cid:५२२)त, त्याला त्याच्या पदावर कायम करण्यात येणार नाही किंवा त्याच्या पदाच्या वेतनमानातील पुढील वेतनवाढ त्याला देण्यात येणार नाही. अशा रितीने रोखून ठेवलेली वेतनवाढ ही, तो परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून किंवा त्याला परीक्षा उत्तीर्ण होण्यामधून नियम-१० अन्वये सूट देण्यात आल्याच्या दिनांकापासून त्याला देय असेल आणि कोणतीही वेतनवाढ रोखून न धरल्याचे समजून पुढील सर्व वेतनवाढी देण्यात येतील. मात्र गतकाळातील थकबाकी अनुज्ञेय नसेल.

५२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३

(९.२) त्याला त्या संवर्गातील आपली ज्येष्ठता गमवावी लागेल म्हणजेच जे कर्मचारी त्याच्या अगोदर परीक्षा उत्तीर्ण झाले असतील, त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या नंतर त्याचा ज्येष्ठता क्रम लागेल. तसेच, अशा ज्या कर्मचाऱ्यांच्या नंतर त्याचा ज्येष्ठता क्रम लागेल, त्या कर्मचाऱ्यास ज्येष्ठ असणाऱ्या आणि त्याच्यानंतर, परंतु नियम-४ मध्ये विनिर्दिष्ट के लेल्या कालावधीत व संधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या देखील नंतरचा ज्येष्ठता क्रम त्याला देण्यात येईल.

१०. परीक्षा उत्तीर्ण होण्यामधून सूट :-

(१०.१) शासन राजपत्राच्या दिनांकापूर्वी नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यास परीक्षा उत्तीर्ण होण्यामधून पुढील बाबतीत सूट देण्यात येईल :-

(अ) त्यास यापूर्वीच कर्मचारी म्हणून कायम करण्यात आले असेल अशा प्रकरणी किंवा

(ब) तो सध्या अस्तित्वात असलेल्या नियमान्वये यापूर्वीच परीक्षा उत्तीर्ण झाला असेल अशा प्रकरणी किंवा, (१०.२) कोणत्याही दिनांकास कर्मचारी ४५ वर्षे वयाचा झाल्यानंतर त्यास परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात येईल.

११. परीक्षा सर्वसाधारणपणे वर्षातून एकदा घेण्यात येईल. एखाद्या वर्षी जर कोणत्याही कारणास्तव परीक्षा घेण्यात आली नाही, तर कालावधी व संधीची गणना करताना कालावधी वगळण्यात येईल.

१२. विशेष योग्यता :-

एखादा कर्मचारी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण झाला असेल आणि त्याने कोणत्याही प्रश्नपत्रिके त ७० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळविले असतील तर त्या प्रश्नपत्रिके तील त्याच्या विशेष योग्यतेबद्दलची नोंद गोपनीय अहवालात घेण्यात येईल.

१३. विषयांमध्ये सूट :-

जो उमेदवार परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेला आहे परंतु ज्याने कोणत्याही प्रश्नपत्रिके मध्ये ५५ टक्के किंवा अधिक गुण मिळविलेले आहे त्याला त्याच्या नंतरच्या प्रयत्नांमध्ये त्या विषयासाठी परीक्षेला बसण्यातून व उत्तीर्ण होण्यातून सूट देण्यात येईल.

१४. निर्वचनाच्या शक्ती:-

नियमातील तरतुदींनुसार अधिकाऱ्यांच्या/कर्मचाऱ्यांच्या एखाद्या संवर्गास कोणती विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे वा कोणत्या संवर्गास ही परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट आहे, यासंबंधी कोणताही विवाद उत्पन्न झाल्यास त्याबाबतचा आयुक्त यांचा निर्णय अंतिम असेल.

०००००००

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ ५३

परिशिष्ट-(३) (अ)

(नियम-३)

विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असलेले संवर्ग

अ.क्र. विभाग/सेवा स ंवर्ग
१. प्रशासकीय सेवा अधिक्षक
२. ल ेखा सेवा उप लेखापाल
३. ल ेखा परीक्षण सेवा ल ेखा परीक्षक

महापालिके व्यतिरिक्त इतर प्राधिकाऱ्याकडू न घेतल्या जाणाऱ्या विहित विभागीय परीक्षा

अ.क्र. विभाग परीक्षा घेणारा प्राधिकारी स ंवर्ग
१. अभियांत्रिकी स्थापत्य/ विद्युत/यांत्रिकी सेवा अभियांत्रिकी अधिकारी महाविद्यालय, नाशिक कनिष्ठ अभियंता/सहाÈयक अभियंता.
२. अग्निशमन सेवा अग्निशमन महाविद्यालय, नागपूर/मु ंबई अग्निशमन विभागातील पदे.

०००००००

भाग चार-ब–१४८-८५४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३

परिशिष्ट-(३) (ब)

विभागीय परीक्षा

प्रश्नपत्रिका-१

(गुण- १००, वेळ-३ तास)

१. सारांश लेखन.

२. टिप्पणी लेखन.

३. पत्र लेखन.

४. भाषांतर (इंग्रजीतून मराठीत).

प्रश्नपत्रिका-२ (पुस्तकांसह) (गुण- १००, वेळ- ३ तास)

१. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम

२. किमान वेतन अधिनियम

३. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५

४. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

५. वस्तु व सेवा कर.

प्रश्नपत्रिका-३ (पुस्तकांसह) (गुण- १००, वेळ- ३ तास)

१) सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम:-

सेवेच्या सर्व साधारण शर्ती

रजा

वेतन

वर्तणूक, शिस्त व अपील

निवृत्तीवेतन

२) विभागीय चौकशी नियम पुस्तिका.

३) रचना व कार्यपद्धती- सहा ग(cid:४४५)े पद्धती.

४) कार्यालयीन नियमपुस्तिका, जमाखर्च लेखा परीक्षा.

५) प्राथमिक हिशोब तपासणी.

टीप: या प्रश्नपत्रिके चे माध्यम मराठी असेल व प्रश्नांची उत्तरे मराठी भाषेत द्यावी लागतील.

०००००००

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ ५५

लेखा विभाग/लेखा परीक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक (लेखा)/कनिष्ठ लेखा परीक्षक यांना प्रश्नपत्रिका-१, २, ३

व्यतिरिक्त पुढे विहित करण्यात आलेल्या विषयांच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागेल

प्रश्नपत्रिका-४ (पुस्तकांसह) (गुण- १००, वेळ- ३ तास)

१. मु ंबई वित्तीय नियम, १९५९.

२. महाराष्ट्र अर्थ संकल्प नियम पुस्तिका प्रकरण क्र. ४,५,७,९ व १७ तसेच परिशिष्टे २, ४, ८, ९, ११ वगळून.

३. महाराष्ट्र सार्वजनिक खर्च नियमावली, १९६५ तसेच नियमावली, १९९२.

४. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावलीतील २,३,६,७,८,९,१०,११,१२-१ ते १२-५ प्रकरणे.

५. महानगरपालिके च्या निविदेसाठीच्या सर्वसाधारण अटी व शर्ती.

प्रश्नपत्रिका-५ (पुस्तकांसह) (गुण- १००, वेळ- ३ तास)

१. Book Keeping & Accountancy.

२. Accrual Based Double Entry Accounting

३. मु ंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम, १९४७

४. मु ंबई प्राथमिक शिक्षण नियम, १९४९

गट - क च्या कर्मचाऱ्यांना गट- ब च्या पदावर पदोन्नती मिळण्यापूर्वी या परिशिष्टातील प्रश्नपत्रिका-१, २ व ३

व्यतिरिक्त खालील प्रश्नपत्रिके त उत्तीर्ण होणे आवश्यक असेल

प्रश्नपत्रिका-६ (पुस्तकांसह) (गुण- १००, वेळ- ३ तास)

१. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६.

२. महानगरपालिका (घनकचरा व्यवस्थापन) उपविधी, २००२.

३. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्षांचे जतन अधिनियम, १९७५.

४. राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान.

५. झोपडप(cid:४४२)ी सुधार समिती.

६. दिव्यांगांसाठीच्या शासनाच्या सवलती व योजना.

७. समाज विकास व बाल कल्याण संबंधीच्या शासनाच्या व महानगरपालिके च्या योजना.

८. कें द्र व महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फ त राबविण्यात येणाऱ्या योजना.

०००००००

भाग चार-ब–१४८-८अ५६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३

परिशिष्ट-(३) (क)

विभागीय परीक्षा (अग्निशमन)

विभाग-अग्निशमन

संवर्ग- अग्निशमन प्रणेता/चालक-यंत्रचालक/अग्निशामक/वाहन चालक (अग्निशमन)

तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा. :-

(गुण- १००)

१) रासायनिक अग्निशामके - प्रकार, उपयोग, देखभाल व निगा

२) शि(cid:५०५)ा - प्रकार, उपयोग, देखभाल व निगा

३) होज पाईप - प्रकार, उपयोग, देखभाल व निगा

४) फोम व होम साधने - प्रकार, उपयोग, देखभाल व निगा

५) हाय(cid:२८२)ंट व होज फिटींग्ज - प्रकार, उपयोग, देखभाल व निगा

६) पंप

- प्रकार, उपयोग, देखभाल व निगा

७) वॉटर रिले - प्रकार, उपयोग, देखभाल व निगा

८) गाठी - प्रकार, उपयोग, देखभाल व निगा

९) श्वसन उपकरणे - साहित्याची नावे व वापर

१०) कवायत - आज्ञापालन व सहकाऱ्याबरोबर कवायत करण्याची क्षमता

लेखी परीक्षा. :-

(गुण- १००, वेळ- २ तास) १) प्रथमोपचार - प्रथमोपचार पेटीतील साहित्य व भाजणे, अस्थिभंग, घुसमटणे, रक्तस्त्राव, जखमा

यांचेवर करावयाच्या प्रथमोपचाराची माहिती देणे.

२) वॉचरूम कार्यपद्धती - वॉचरुममध्ये ठेवल्या जाणाऱ्या रेकॉर्डची माहिती, त्यासाठी वापरली जाणारी

कार्यपद्धती नमुने व काल्पनिक संदेशावर वॉचरुमच्या रेकॉर्डमध्ये नोंद करणे.

३) अग्निशामक व (cid:२८२)ायव्हर - पदाच्या कर्तव्यांची माहिती असणे व ती कर्तव्य पार पाडण्यासाठी कराव्या लागणाऱ्या

कामाबद्दलचा तपशील (cid:२८२)ायव्हर ऑपरेटर पदाची कर्तव्ये.

४) शिस्त व कर्तव्यपालन - शिस्तीचे व कर्तव्य पालनाचे अग्निशमन विभागातील महत्व व त्यांचे पालन न

झाल्यास होणारे परिणाम. कर्तव्य पालन न झाल्यामुळे वा झाल्यामुळे आठवणीत

राहिलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन.

०००००००

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ ५७

परिशिष्ट-(४)

नामनिर्देशन/सरळसेवा भरती करताना अग्निशमन विभागासाठी निकष व गुणांकन पद्धती

१. शैक्षणिक अर्हता व अनुभव :-

(१.१) अग्निशमन पदांसाठी शैक्षणिक अर्हता व अनुभव हा सदर नियमांच्या परिशिष्ट-(२) मध्ये दर्शविल्याप्रमाणे राहील.

(१.२) शारीरिक पात्रता :-

पुरुष महिला
• उंची - किमान १६५ सें.मी. (अनवाणी) • छाती - न फु गविता ८१ सें.मी. - फु गवून ८६ सें.मी. ( किमान ५ सें.मी. फ ु गवणे आवश्यक.) • वजन- ५० कि.ग्रॅ. • दृष्टी- सामान्य. (विना चष्म्याने दृष्टी-६/६ तसेच Ishihara Chart नुसार र ंगदृष्टी चांगली). वर्णांधता आजारापासून मुक्त असावा. • उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्Ƿा सुदृढ असावा. • उंची - किमान १५७ सें.मी. (अनवाणी) • छाती - महिला उमेदवारांसाठी लागू नाही. • वजन - ४६ कि.ग्रॅ. • दृष्टी - सामान्य. (विना चष्म्याने दृष्टी-६/६ तसेच Ishihara Chart नुसार र ंगदृष्टी चांगली). वर्णांधता आजारापासून मुक्त असावा. • उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्Ƿा सुदृढ असावा.

२. परीक्षेचे टप्पे :-

प्रस्तुत परीक्षा एकू ण दोन टप्प्यात घेण्यात येईल:-

(१) लेखी परीक्षा-१०० गुण. (२) शारीरिक चाचणी-१०० गुण.

(२.१) लेखी परीक्षा :-

(१) लेखी परीक्षा (तांत्रिक/सामान्यज्ञान) १०० गुणांची असेल.

(२) लेखी परीक्षेसाठी उमेदवाराकडे सेवा भरती नियमात नमूद शैक्षणिक पात्रता/तांत्रिक शिक्षणाची अर्हता तसेच शारीरिक क्षमता असणे आवश्यक राहील.

(३) जाहिरातीस असणारा एकू ण प्रतिसाद विचारात घेऊन आवश्यक तेव(cid:५०६)ा (साधारणत: १:५ किंवा १:७ या प्रमाणात) उमेदवारांना शारीरिक चाचणी परीक्षेस पात्र ठरविण्यात येईल.

(४) लेखी परीक्षेकरिता विहित के लेले किमान गुण प्राप्त करणारे उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरतील.

५८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३

(२.२) मैदानी चाचणी (पुरुषांसाठी)

(१०० गुण)

(अ) १६०० मीटर धावणे

(३० गुण)

१६०० मी. अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी द्यावयाचे गुण
५ मि. १० सेकं द किंवा त्यापेक्षा कमी. ३०
५ मि. १० सेकं दापेक्षा जास्त परंतु ५ मि. ३० सेकं द किंवा त्यापेक्षा कमी. २७
५ मि. ३० सेकं दापेक्षा जास्त परंतु ५ मि. ५० सेकं द किंवा त्यापेक्षा कमी. २४
५ मि. ५० सेकं दापेक्षा जास्त परंतु ६ मि. १० सेकं द किंवा त्यापेक्षा कमी. २१
६ मि. १० सेकं दापेक्षा जास्त परंतु ६ मि. ३० सेकं द किंवा त्यापेक्षा कमी. १८
६ मि. ३० सेकं दापेक्षा जास्त परंतु ६ मि. ५० सेकं द किंवा त्यापेक्षा कमी. १५
६ मि. ५० सेकं दापेक्षा जास्त परंतु ७ मि. १० सेकं द किंवा त्यापेक्षा कमी. १०
७ मि. १० सेकं दापेक्षा जास्त परंतु ७ मि. ३० सेकं दापेक्षा कमी. ०५
७ मि. ३० सेकं दापेक्षा जास्त ००

(ब) जमिनीपासून ३३ फु ट उंचीवरील खिडकीस लावलेल्या (४६.४' वरील उंचीच्या) ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपय(cid:५२२)त वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे.(आरंभ रेषेपासून शिडी २० फु ट अंतरावर

व ेळ (सेकं दामध्ये) द्यावयाचे गुण
२० सेकं दापयȊत २०
२० सेकं दापेक्षा जास्त ते २५ सेकं दापयȊत १६
२५ सेकं दापेक्षा जास्त ते ३० सेकं दापयȊत १२
३० सेकं दापेक्षा जास्त ते ३५ सेकं दापयȊत ०८
३५ सेकं दापेक्षा जास्त ते ४० सेकं दापयȊत ०४
४० सेकं दापेक्षा जास्त ००

(क) ५० कि.ग्रॅ. वजनाची मानवीय प्रतिकृ ती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने ६० मीटर अंतर

व ेळ (सेकं दामध्ये) द्यावयाचे गुण
२० सेकं दापयȊत २०
२० सेकं दापेक्षा जास्त ते २५ सेकं दापयȊत १६
२५ सेकं दापेक्षा जास्त ते ३० सेकं दापयȊत १२
३० सेकं दापेक्षा जास्त ते ३५ सेकं दापयȊत ०८
३५ सेकं दापेक्षा जास्त ते ४० सेकं दापयȊत ०४
४० सेकं दापेक्षा जास्त ००
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३ ५९

(ड) २० फु ट उंचीपय(cid:५२२)त रस्सीवर चढणे व उतरणे.

(२० गुण)

रस्सी पूर्ण चढल्यास २० गुण, ३/४ (तीन चतुर्थांश) चढल्यास १० गुण, १/२ (अर्धी) चढल्यास ५ गुण तर अध्र्यापेक्षा कमी अंतर चढल्यास शून्य गुण दिले जातील. (रस्सीवर चढतेवेळी फक्त हाताचा वापर करणे बंधनकारक राहील. पायाचा वापर करता येणार नाही, के ल्यास शून्य गुण मिळतील.)

(इ) २० पुल-अप्स

(१० गुण)

प्रत्येक पुल-अपला १/२ (अर्धा) गुण, याप्रमाणे २० पुल-अप्स पूर्ण के ल्यास १० गुण देण्यात येतील.

(२.३) मैदानी चाचणी- महिलांसाठी

(१०० गुण)

(अ) ८०० मीटर धावणे

(३० गुण)

८०० मी. अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी द्यावयाचे गुण
२ मि. ५० सेकं दापयȊत ३०
२ मि. ५० सेकं दापेक्षा जास्त ते ३ मि. ०० सेकं दापयȊत २७
३ मि. ०० सेकं दापेक्षा जास्त ते ३ मि. १० सेकं दापयȊत २४
३ मि. १० सेकं दापेक्षा जास्त ते ३ मि. २० सेकं दापयȊत २१
३ मि. २० सेकं दापेक्षा जास्त ते ३ मि. ३० सेकं दापयȊत १८
३ मि. ३० सेकं दापेक्षा जास्त ते ३ मि. ४० सेकं दापयȊत १५
३ मि. ४० सेकं दापेक्षा जास्त ते ३ मि. ५० सेकं दापयȊत १०
३ मि. ५० सेकं दापेक्षा जास्त ते ४ मि. ०० सेकं दापयȊत ०५
४ मि. ०० सेकं दापेक्षा जास्त ००

(ब) जमिनीपासून ३३ फु ट उंचीवरील खिडकीस लावलेल्या (४६.४' वरील उंचीच्या) ॲल्युमिनियम

एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपय(cid:५२२)त वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे. (२० गुण)

व ेळ (सेकं दामध्ये) द्यावयाचे गुण
३० सेकं दापयȊत २०
३० सेकं दापेक्षा जास्त ते ४० सेकं दापयȊत १५
४० सेकं दापेक्षा जास्त ते ५० सेकं दापयȊत १०
५० सेकं दापेक्षा जास्त ते ६० सेकं दापयȊत ०५
६० सेकं दापेक्षा जास्त ०
६० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून ८, २०२१/ ज्येष्ठ १८, शके १९४३

(क) ४० कि.ग्रॅ. वजनाची मानवाकृ ती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने ६० मीटर अंतर

धावणे.

(२० गुण)

व ेळ (सेकं दामध्ये) द्यावयाचे गुण
२५ सेकं दापयȊत २०
२५ सेकं दापेक्षा जास्त ते ३० सेकं दापयȊत १६
३० सेकं दापेक्षा जास्त ते ३५ सेकं दापयȊत १२
३५ सेकं दापेक्षा जास्त ते ४० सेकं दापयȊत ०८
४० सेकं दापेक्षा जास्त ते ४५ सेकं दापयȊत ०४
४५ सेकं दापेक्षा जास्त ०

(ड) गोळा फे क (गो(cid:२०८)याचे वजन ४ कि.ग्रॅ.)

(१० गुण)

गोळा फे कीचे अंतर (मीटरमध्ये) द्यावयाचे गुण
६ मीटर व त्यापेक्षा जास्त १०
५.५० मीटर ते ६ मीटरपेक्षा कमी ०८
५ मीटर ते ५.५० मीटरपेक्षा कमी ०६
४.५० मीटर ते ५ मीटरपेक्षा कमी ०४
४ मीटर ते ४.५० मीटरपेक्षा कमी ०२
४ मीटरपेक्षा कमी ०

(इ) लांब उडी

(१० गुण)

अंतर (फु टामध्ये) द्यावयाचे गुण
१५ फु ट व त्यापेक्षा जास्त १०
१३ फु ट ते १५ फु टापेक्षा कमी ०८
११ फु ट ते १३ फु टापेक्षा कमी ०६
०९ फु ट ते ११ फु टापेक्षा कमी ०४
०९ फु टापेक्षा कमी ०

(फ) १० पुश अप (जोर काढणे)

(१० गुण)

प्रत्येक १ पुश अपला १ गुण, याप्रमाणे १० पुश अप पूर्ण के ल्यास १० गुण देण्यात येतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, दिनांक ०७ जून २०२१.

नवनाथ रा. वाठ,

शासनाचे अवर सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 June 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-06-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-06-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.